---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेतील अधिकाऱ्यांची खांदेपालट

jalgaon manapa
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२४ । जळगाव शहर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची खांदेपालट झाली असून, मंगळवारी आयुक्तांनी काढलेल्या पत्रकानुसार अधिकाऱ्यांवर विविध विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक विद्युत विभाग, प्रकल्प विभाग, शिक्षण विभाग, भांडार विभाग, विधी विभागाचा पदभार सोपवण्यात आला असून, उपायुक्त अविनाश गांगोडे यांच्याकडे सामान्य प्रशासन अंतर्गत प्रमुख कार्यालय, आस्थापना, जनगणना व निवडणूक, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवाल अंमलबजावणी, सार्वजनिक स्वच्छता विभाग, अतिक्रमण विभाग, वाहन विभाग, जन्म मृत्यू नोंदणी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

jalgaon manapa

दरम्यान, उपायुक्त निर्मला गायकवाड यांच्याकडे महिला बाल कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण व सामाजिक कल्याण विभाग, दवाखाना व मलेरिया विभाग, किरकोळ वसुली विभाग, प्रकल्प विभागाचा पदभार देण्यात आला आहे. उपायुक्त धनश्री शिंदे यांच्याकडे मालमत्ता कर निर्धारण व संकलन विभाग, डेली मार्केट फी वसुली विभाग, खुला भूखंड कर निर्धारण व संकलन विभाग, घरकुल सेवा शुल्क वसुली विभागाचा पदभार महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांची खांदेपालट दिला असून सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड यांच्याकडे सार्वजनिक विद्युत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, दिव्यांग व सामाजिक कल्याणचा पदभार दिला आहे.

---Advertisement---

अभिजित बाविस्कर यांच्याकडे शिक्षण, विधी, क्रीडा व सांस्कृतिक, भांडार, पर्यावरण-प्रदूषण नियंत्रण विभाग दिला आहे. तसेच गणेश चाटे यांच्याकडे मालमत्ता कर निर्धारण व संकलन, डेली मार्केट फी वसुली, खुला भूखंड कर निर्धारण व संकलन विभाग, घरकुल सेवा शुल्क वसुली, परिवहन ई-बस सेवा, सार्वजनिक पाणी पुरवठा, अतिक्रमण, वाहन, किरकोळ वसुली, एलबीटी विभागाचा पदभार सोपवण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---