जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग ६ अ मधून हेतल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डिसेंबर 31, 2025 7:42 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण तापले असून अनेक दिग्गज उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. या पार्श्वभूमीवर पत्रकार चेतन वाणी यांच्या पत्नी हेतल महेंद्र पाटील यांनी प्रभाग क्रमांक ६ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

hetal wani

हेतल पाटील या प्रभागातीलच रहिवासी असून “प्रभागाची लेक” म्हणून त्यांची ओळख आहे. स्थानिक नागरिकांच्या समस्या, दैनंदिन अडचणी आणि मूलभूत प्रश्नांची त्यांना सखोल जाण असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. पत्रकार कुटुंबातील पार्श्वभूमीमुळे जनतेचे प्रश्न, प्रशासनातील त्रुटी आणि लोकशाही मूल्यांची जाण असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Advertisements

उमेदवारी अर्ज दाखल करताना हेतल पाटील यांनी विकास, पारदर्शक कारभार, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिलांचे प्रश्न तसेच युवकांच्या संधी या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. “जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्या महापालिकेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणे आणि सोडवणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असून आमचा विजय निश्चित आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Advertisements

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीचे प्रतिनिधी तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रभाग ६ अ मध्ये निवडणुकीची रंगत वाढली असून पुढील काळात प्रचार अधिक वेग घेण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now