---Advertisement---
जळगाव शहर

तोडीपानीच्या आरोपावरून महासभा तापली, उपमहापौरांचा एकेरी उल्लेख

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२१ । शहर मनपातील (Jalgaon Municipal Corporation) महासभेच्या व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील (Kulbhushan Patil) यांना बसण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न नगरसेवक कैलास सोनवणे (Kailas Sonavane) यांनी उपस्थित केला. उपमहापौरांचा एकेरी उल्लेख केल्याने दोघांमध्ये चांगलीच जुंपली. नगररचना विभागात प्रत्येक फाईलसाठी तोडीपानी केली जात असल्याचा आरोप सोनवणे यांनी केल्याने चांगलीच गरमागरमी झाली. तब्बल तासभर दोघांमधील वाद सुरू होता. अखेर महापौरांनी मध्यस्थी वाद मिटला आणि पुढील कामकाज सुरू झाले.

jalgaon manapa sabha

कोरोना आणि लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच जळगाव मनपाची महासभा ऑफलाईन पध्दतीने होत आहे. महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता सभेला सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम अभिनंदनाचे प्रस्ताव घेण्यात आले. नगरसचिव सुनील गोराणे यांनी प्रस्ताव वाचून दाखविले. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त डॉ.सतीश कुलकर्णी (Dr. Satish Kulkarni), नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.

---Advertisement---

महासभेत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित करीत, उपमहापौरांना महासभेत व्यासपीठावर बसण्याचा अधिकार आहे का? अशी विचारणा केली. त्यावर उपमहापौर कुलभूषण पाटील हे उत्तर देत असताना नगरसेवक कैलास सोनवणे यांनी त्यांचा एकेरी उल्लेख करीत तोडीपानीचा आरोप केला. उपमहापौरांना व्यासपीठावर बसण्याचा अधिकार आहे का? अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा अधिकार आहे का? उपमहापौरांनी नगररचना विभागाला सूचना देत सर्व फाईल माझ्या नजरेखालून घालण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्व तोडीपानीसाठी हे सुरू असल्याचे नगरसेवक सोनवणे यांनी सांगितले.

सोनवणे यांनी एकेरी उल्लेख केल्याने उपमहापौर कुलभूषण पाटील हे देखील संतापले. आपण पदावर असताना काय केले हे सर्वांना परिचित आहे. तोडीपानी कुणी केली हे मला बोलायला नका लावू. असे पाटील म्हणाले. जोशी नामक व्यक्तीकडून पैसे मगितल्याचा आरोप सोनवणे यांनी केला असता उपमहापौरांनी त्याचे खंडन करीत जोशी कैलास सोनवणे यांचा मित्र असेल त्याला सभागृहात बोलावून समोरासमोर करून घ्यावे असे आव्हान त्यांनी दिले. तब्बल तासभर दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते. अखेर महापौर आणि जेष्ठ नगरसेवकांनी मध्यस्थी केल्याने आजच्या बैठकीत उपमहापौर कुलभूषण पाटील यांना व्यासपीठावर बसू देत नियम काय आहे आणि इतर माहिती घेऊन त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे ठरविण्यात आले.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/627471211782384

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---