⁠ 
सोमवार, जून 17, 2024

रक्षा खडसे मला मुलीसारख्या, आम्हाला एकनिष्टतेचे फळ मिळाले ; खासदार स्मिताताई वाघ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२४ । रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी होणाऱ्या भाजपच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली असून त्या आज सायंकाळी दिल्ली येथे मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. यावर जळगावच्या नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खऱ्या अर्थाने रक्षा खडसे यांना न्याय मिळाला असून गेली दहा वर्षे त्यांनी चांगले काम केले आहे. तिच्या पुढच्या काळासाठी तिला आपण शुभेच्छा देतो असे भाजपाच्या नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले. नाथाभाऊ गेलेले असले तर रक्षा खडसे या कायम भाजपाशी एकनिष्ठ राहील्या आहेत. एकनिष्टतेचे फळ हे काय असते हे माझ्या पेक्षा आणखी कोण सांगू शकते. जळगाव लोकसभेला पहिल्यांदा तिकीट मिळाले होते.

त्यावेळी रक्षा खडसे यांनी माझ्याशी सल्लामसलत केली होती, मला त्या मुली सारख्या आहेत अशी प्रतिक्रीया जळगाव लोकसभेतून निवडून आलेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे. रक्षा यांची ही तिसरी टर्म आहे. त्यांनी दहा वर्षे चांगली कामगिरी केली आहे. आता देखील त्या चांगली करतील असेही स्मिता वाघ यांनी म्हटले आहे. नाथाभाऊ यांच्याबद्दल विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार देत याबद्दल वरिष्ठच योग्य ती माहीती देऊ शकतील असेही स्मिता वाघ यांनी सांगितले.