जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२४ । यंदा केरळासह महाराष्ट्रात मान्सूनने वेळेआधी एंट्री मारली आहे. राज्यातील अनेक भागात मान्सूननं व्यापला असून मात्र जळगाव जिल्ह्यात मान्सून कधी दाखल होणार? याची प्रतीक्षा जळगावकरांना लागली आहे. अशातच आता याबाबत हवामान खात्याने महत्वाची माहिती आहे.
भारतीय हवामान विभागानं मान्सूननं कुठंपर्यंत प्रवास केला आहे याची माहिती दिली. हवामान विभागानं जारी केलेल्या नकाशानुसार नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात विदर्भापर्यंत पोहोचले आहेत. गुजरातमधील नवसारी, महाराष्ट्रात जळगाव, अमरावती आणि चंद्रपूर पर्यंत मान्सून दाखल झाला आहे.
जळगावात मान्सून दाखल झाला असला तरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसापासून जिल्ह्यात ऊन सावलीचा खेळ सुरु असल्याने तापमानात घसरण पाहायला मिळाली. आज गुरुवारही पहाटपासून ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे काल बुधवारी जळगावचे तापमान ३५ अंशावर आले. यामुळे जळगावकरांना उन्हाच्या चटक्यापासून काहीसा दिलासा मिळालं.
दरम्यान जिल्ह्यात खरीप पिकांसाठी शेती शिवार पेरणीपूर्व मशागतीने तयार झाले असून मान्सूनच्या प्रतिक्षेसह पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार आता जळगावात मान्सून दाखल झाला आहे. मात्र पावसाचा अंदाज कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाहीय. यामुळे आता जोरदार पाऊस कधी बरसेल, याची प्रतीक्षा आहेत.
आज राज्यातील या जिल्ह्यात पावसाचा इशारा :
आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर १४ जूनपासून राज्यात पावसामध्ये काही खंड पडण्याची शक्यता वर्तवलीआहे.मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम पावसाची शक्यता आहे. तर धाराशिव, लातूर, बुलडाणा, पुणे, नगर, सोलापूर, अकोला, अमरावती, वाशीम, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.