जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. यामुळे उष्णतेची लाट काहीशी कमी झाल्याने तापमानातही घट झाली आहे. जळगाव जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसात तापमानाचा पारा एक ते दीड अंशाने कमी झाल्याचे दिसून येतेय. काल शनिवार जळगावचा पारा ४१.७ अंशांपर्यंत खाली आला होता. आज रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत उन्हाचा पारा ३८ अंशावर होता. तर दुपारी ३ पर्यंत पारा ४२ अंशावर जाणार असल्याचे दर्शविले जात आहे.
उद्या म्हणजेच 18 एप्रिलपासून कोकणासह (Kokan) मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) पावसाचा इशारा (IMD Alert) देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे या भागामध्ये पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पण विदर्भात (Vidharbh) उन्हाचे चटके कायम राहणार आहेत. विदर्भात उन्हाचा पारा 44 अंशावर पोहचला आहे. त्यामुळे उन्हाचे चटके आणखी लागणार आहेत.
अवकाळी पावसाचे सावट कायम असल्यामुळे तापमानात घट झाली आहे. शनिवारी दिवसभर उन्ह-सावल्यांचा खेळ सुरू हाेता. वाऱ्याचा वेगही ताशी १६ किमीपर्यंत वाढलेला हाेता. ढगाळ स्थितीमुळे उठणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेचा वेग ताशी ३४ किमीपर्यंत वाढला हाेता. शनिवारी जळगावात तापमान ४१.७ अंशांपर्यंत खाली आले हाेते; मात्र सूर्याचा अतिनील किरणाेत्सर्ग (अल्ट्राव्हायलेट) इंडेक्स १२ च्या अतिउच्च पातळीवर हाेता.
जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान असे?
वेळ – अंश
१२ वाजेला – ३९ अंश
१ वाजेला – ४१ अंश
२ वाजेला- ४१ अंश
३ वाजेला – ४२ अंश
४ वाजेला – ४२ अंश
५ वाजेला – ४१ अंश
६ वाजेला – ३८ अंश
७ वाजेला – ३६ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३४ अंशावर स्थिरावणार.