जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२४ । गेल्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट असून तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. जळगावचे तापमान 46.3 अंशावर गेले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात एवढे तापमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. वाढता तापमानामुळे जळगावचे जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते तापमानामुळे रस्ते ओस पडले आहे
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सकाळी दहापासूनच उन्हाचे चटके बसत आहेत. रात्री आठपर्यंत उन्हाच्या झळ जाणवत आहेत. वाढत्या तापमानामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याने शरीरातून घामाच्या धारा बाहेर पडतात. सकाळपासून उन्हाच्या कडाक्याने अंगाची लाहीलाही होत आहे.
जिल्ह्यात सध्या उष्णेतेची लाट कायम असून तापमानाचा पारा 46.3 अंशावर गेला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.
वाढत्या तापमानामुळे जळगावकर नागरिक हैराण झाले असून रुमाल टोपी घालूनच घराबाहेर पडावे लागत असून दैनंदिन कामे ही सकाळच्या सुमारास करून घ्यावी लागत आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे विनाकारण बाहेर पडू नका असे आवाहन जळगावकर नागरिकांना करण्यात आले आहे. पुढील काळात देखील तापमानाचा पारा हा वाढू शकतो असे मत हवामान तज्ञांनी व्यक्त केले आहे