---Advertisement---
जळगाव शहर

सायकलस्वार कोरोना योध्याचा महापौरांकडून सन्मान

honors cyclist corona warrior
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२१ । कोल्हापूर येथून सायकलने प्रवास करीत संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निघालेल्या नितीन नांगेनूकर हा तरुण जळगावात आला असता महापौर जयश्री महाजन यांनी त्याची आस्थेवाईकपणे चौकशी करीत सन्मान केला.

honors cyclist corona warrior

कोल्हापूर येथील नितीन गणपत नांगेनुरकर (वय २९) या तरुणाने १ सप्टेंबर २०२० रोजी कोल्हापूरवरुन आपल्या स्वतःच्या सायकलने प्रवास करीत कोरोना रोखण्यासाठी महाराष्ट्रभ्रमण सुरू केले आहे. तो तरुण जळगाव येथे आला असता त्याने महापौर जयश्री महाजन यांची भेट घेतली. 

---Advertisement---

महापौर जयश्री महाजन यांनी त्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तरुणाने अंगात कोरोना काळात घ्यावयाचे काळजी विषयीचे बॅनर घातले असून त्याने आपल्या डोक्याच्या केसांची कटिंग सुद्धा ‘गो कोरोना’ या वाक्याची केली आहे. सायकलीवर सुद्धा जो झेंडा लावला आहे त्यावर सुद्धा कोरोना रोखण्याचे ब्रीद वाक्य लिहलेले आहे. डोक्यावर टोपी देखील सूचनांचे वाक्य असलेली घातली आहे. 

महापौर जयश्री महाजन यांनी नितीन नांगेनूकर यांचा सन्मान करून त्यांना सहकार्य देखील केले तसेच पुढील वाटचाल व प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---