जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२४ । जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसागणित वाढताना दिसत असून असह्य होणाऱ्या उकाड्यामुळे जळगावकर अक्षरक्ष: हैराण झाला आहे. यातच आता आग ओकणाऱ्या मे हिटचा तडाखा आजपासून दिसून येईल. मे महिन्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
जळगाव शहरात दोन दिवसापूर्वी म्हणजेच सोमवारी सर्वाधिक तापमान होते. आयएमडीवर ४३ तर खासगी संकेतस्थळावर ४४ अंश तापमानाची नोंद झाली होती. २३ एप्रिलला तापमान ४० डिग्री सेल्सिअस होते. या वर्षी एप्रिल महिन्यात तब्बल ९ दिवस पारा चाळिशीपार गेला. यापूर्वी काल ३० एप्रिल २०१४ रोजी देखील पारा ४४ वर होता. सकाळपासूनच कडाक्याचे ऊन पडत असल्याने उकाड्यात मोठी वाढ झाली आहे.उन्हाच्या तडाख्याने घामाच्या धारा वाहत असून असह्य उकाड्याने जनजीवन प्रभावित आहे.
दरम्यान, आता मे महिन्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मात्र यातच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी देखील समोर येत आहे. ती म्हणजेच यंदा मान्सून लवकरच केरळात धडकणार आहे. येत्या २१ ते २५ दिवसांत मान्सून केरळमध्ये धडकणार आहे. हवेचा दाब मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल असल्याचे सांगितले जाते आहे.
उष्णतेमुळे बाजारपेठेवर परिणाम
दरम्यान, सध्या वाढलेल्या तापमानाचा परिणाम बाजारपेठेवर दिसू लागला आहे. सकाळी साडेसात ते दहापर्यंत स्थानिक ठिकाणी भाज्या व फळे खरेदीसाठी नागरिक बाहेर पडतात. दुपारच्या वेळीस तीव्र उन्हाच्या झळा असल्याने शहरातील फुले मार्केट, दाणा बाजार आदी ठिकाणी शांतता दिसून येते. सायंकाळी सहा ते आठदरम्यान बाजारपेठेतमध्ये गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे