⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | महत्वाची बातमी! जळगाव- मनमाड दरम्यान मेगाब्लॉक ; दोन दिवसांसाठी ‘या’ 35 रेल्वेगाड्या रद्द

महत्वाची बातमी! जळगाव- मनमाड दरम्यान मेगाब्लॉक ; दोन दिवसांसाठी ‘या’ 35 रेल्वेगाड्या रद्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२३ । भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्ये रेल्वे विभागातील जळगाव- मनमाड दरम्यान तिसरा रेल्वे मार्ग आणि दुहेरी मार्गाच्या यार्ड रिमॉडेलिंग कामासाठी मेगाब्लॉक (Railway Megablock)घेण्यात येणार आहे. यासाठी १४ व १५ ऑगस्ट या दोन दिवसांसाठी तब्बल ३५ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात डाऊन मार्गावरील १८, तर अप मार्गावरील १७ गाड्यांचा समावेश आहे.

अशा आहेत रद्द करण्यात आलेल्या डाऊन गाड्या आणि त्यांच्या तारखा

गाडी क्र. ११११३- देवळाली भुसावळ एक्स्प्रेस १४ व १५ रोजी देवळाली येथून सुटणारी गाडी रद्द.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड-जळगाव स्थानकादरम्यान तिसऱ्या लोहमार्गाच्या कामासह दुहेरी मार्ग यार्ड रिमॉडेलिंग कामामुळे १४ आणि १५ ऑगस्ट रोजी या मार्गावरील ३३ गाड्या रद्द करण्यात आल्या असून,

१९ गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे अतोनात हाल होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने दि. १४ व दि. १५ रोजी मेगाब्लॉक असला तरी दि. १३ व १६ रोजीही काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

१3 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या : भुसावळ- देवळाली एक्स्प्रेस, बलिया – दादर एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई एक्स्प्रेस.

१४ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या: भुसावळ- देवळाली एक्स्प्रेस, नांदेड – मुंबई एक्स्प्रेस, जालना – मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई – नांदेड एक्स्प्रेस, सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई एक्स्प्रेस, साईनगर मुंबई वंदे भारत ट्रेन, भुसावळ – इगतपुरी एक्स्प्रेस, जबलपूर-पुणे एक्स्प्रेस, रीवा – पनवेल एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, पुणे – नागपूर एक्स्प्रेस, गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, आदिलाबाद – मुंबई एक्स्प्रेस, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस.

१५ रोजी रद्द करण्यात गाड्या : मुंबई – साई नगर शिर्डी वंदे भारत ट्रेन, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, इगतपुरी-भुसावळ एक्स्प्रेस, मुंबई – जालना एक्स्प्रेस, पुणे – जबलपूर एक्स्प्रेस, दादर – बलिया एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई – आदिलाबाद एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, मुंबई – सिकंदराबाद एक्स्प्रेस, पनवेल- रीवा एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनल-नांदेड एक्स्प्रेस, नांदेड – मुंबई एक्स्प्रेस, जालना-मुंबई एक्स्प्रेस, आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई – नांदेड एक्स्प्रेस. या शिवाय, दि. १६ रोजी बलिया -दादर एक्स्प्रेस व गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून, १९ प्रवाशी गाडयांचे मार्गही बदलण्यात आले आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.