जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात काही डॉक्टरांच्या व हॉस्पिटलच्या प्रवृत्ती व व्यवस्थापने मुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम होत आहे कोरोना आपत्ती सारख्या बिकट प्रसंगात जळगाव शहरातील सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, राजकीय संघटनांसह केमिस्ट असोसिएशन, आय एमए, रेड क्रॉस, जळगाव शहर मनपा, जळगाव उद्योग क्षेत्रातील औद्योगिक संस्था यांनीसुद्धा समाजाला वाऱ्यावर सोडून बघ्याची भूमिका घेता कामा नये प्रत्येक संस्थेने व संघटनांनी या उदात्त सेवा क्षेत्रात स्वतःची व नैतिकतेची चौकट आखून सद्सद्विवेक बुद्धीने आज सेवा देणे अगत्याचे आहे.

जळगाव शहरात व जिल्ह्यात सुद्धा डॉक्टर, दवाखाने, मेडिकल स्टोर व केमिस्ट असोसिएशन यांच्याबाबत जाहीरपणे काही राजकीय व्यक्ती, समाज सेवक, माहिती अधिकार कार्यकर्ते व माध्यमे फसवणूक, लुटमार, शोषण, ब्लॅक मार्केटिंग अशा मानहानीकारक आशयाचे आरोप करताना दिसत आहे. हे जर आम्हास खोडायचे असेल तर आम्ही रडणे सोडून प्रत्यक्ष रणांगणात उतरणे आवश्यक असल्याचे आवाहन मुस्लिम मानियार बिरदारीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी एका पत्रका द्वारे केले आहे.
केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे
जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी ने २५ बेडचे डेडीकेट कोविड हेल्थ सेंटर हे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ९ एप्रिल पासून सुरू केले असून ना नफा ना तोटा या तत्त्वावर हे हॉस्पिटल सुरू आहे.
शासन दरा पेक्षाही कमी दरात सेवा
जनरल वार्ड २५००/- आयसीयु ओटू सहित ६०००/-व बाय पेप ७५००/- रुपये या दराने रुग्णांकडून फी घेऊन ही वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे.
सदर सेंटर सुरू झाल्यापासून आयसीयु ओटू ची १२ बेड फुल आहे तर बिना ऑक्सिजन वार्ड मध्ये तेरा बेड पैकी ५-६ रुग्ण दररोज असतात.
जळगावातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा
प्रशासनावर संपूर्णपणे अवलंबून न राहता आपण सुद्धा समाजाचे काही देणे लागतो व आज माणुसकीला मदत हवी आहे कृपया आपण प्रथम एक मनुष्य व्हा या उदात्त हेतूने सामाजिक संघटनांनी पंधरा-वीस खाटांचे आप आपल्या वार्डात, गल्लीत ऑक्सिजन बेडचे दवाखाने सुरू करा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे १०० टक्के सहकार्य मिळते हा अनुभव सुद्धा फारुक शेख यांनी पत्रका द्वारे व्यक्त केलेला आहे.
तज्ञ डॉक्टर व समाज मनाचे सहकार्य
मानियार बिरादरीच्या दवाखान्यात जळगांव मधील तज्ञ डॉक्टर सुयोग चौधरी व डॉ मंधार पंडित हे फक्त मानव सेवा बिना मानधन ने करीत आहे तर काही दाते हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्य करीत आहे।