---Advertisement---
जळगाव शहर

मनपाच्या कोविड सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा खालावला, अनेकांना जेवण नाहीच

jalgaon
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मनपाच्या कोविड सेंटरमध्ये काही रुग्णांना जेवण उपलब्ध होत नाही. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा खालावला असल्याच्या तक्रारी नगरसेवक कैलास सोनवणे यांना प्राप्त झाल्या असता त्यांनी भेट देत पाहणी केली. नागरिकांच्या तक्रारी ऐकून नगरसेवक कैलास सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना बोलावून जाब विचारला. 

jalgaon

शहर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये नागरिकांना वेळेवर जेवण मिळत नाही, काही नागरिकांना जेवण, नाश्ता उपलब्ध होत नाही, जेवणात फळ म्हणून दररोज केळीच दिली जाते अशा तक्रारी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्याच तक्रारी येत असल्याने सोमवारी दुपारी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी भगवान सोनवणे यांच्यासह जाऊन पाहणी केली. कोविड रुग्णांशी चर्चा केली असता त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. कैलास सोनवणे यांनी लागलीच महापौरांशी याबाबत संवाद साधला. तसेच मनपा अधिकारी शुक्ला व नाष्ट्ये यांना बोलावून घेतले. 

---Advertisement---

नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मनपा भांडारपालला विचारणा केली असता जेवणाचा मक्ता पूजा केटरर्सला दिला असून प्रति व्यक्ती प्रति दिवस १४० रुपये प्रमाणे खर्च दिला जातो. मक्तेदाराने दोन वेळा जेवण, दोन वेळा चहा, एक वेळ नाश्ता आणि फळे देण्याचे त्यात नमूद असल्याची माहिती त्याने दिली. फळे केवळ केळी द्यावी का? जेवणाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी का पार पाडली जात नाही याबाबत नगरसेवक सोनवणे यांनी मनपा अधिकाऱ्यांना विचारणा केली. तसेच नागरिकांची तक्रार लेखी घेऊन मनपा आयुक्तांना कळवावे, असेही सोनवणे यांनी सांगितले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---