जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२१ । जळगाव येथील महानगरपालिकेचा अजब कारभार समोर आला आहे. चक्क सहा महिन्यांपासून बंद असलेल्या घरालाच ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित करणारा बोर्ड लावल्याने मनपाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोरोनाची लक्षणे जाणवली तर नागरिक अँटीजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी करतात. या चाचणीत जर नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले तर त्यांना कोविड सेंटर अथवा कोविड रुग्णालयात भरती केली जाते. ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे असतात त्यांना गृह विलगीकरणात देखील ठेवण्याची परवानगी महानगरपालिकेच्या विभागाकडून दिली जाते. त्यानंतर त्यांच्या घरावर प्रतिबंधित क्षेत्र असा फलक देखील लावला जातो.
नवीपेठ येथील डॉ. कैलास मुंगड यांचे घर सुमारे सहा महिन्यांपासून बंद आहेत. तरीदेखोल बुधवारी महानगरपालिकेच्या पथकाने त्यांच्या घराला प्रतिबंधात्मक क्षेत्राचा बोर्ड लावल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संबंधित अधिकाऱ्याला फोन करून विचारले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही