---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावकर ‘ऑक्टोबर हिट’ने हैराण ; उकाड्यातून कधी मिळणार दिलासा?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२३ । सध्या देशात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. मात्र, राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. जळगावमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून पारा ३४ ते ३६ अंशांपर्यंत कायम असल्याने जळगावकरांना ‘ऑक्टोबर हीट’ने चांगलेच ग्रासल्याचे चित्र आहे. तापमानात वाढ झाल्याने असह्य उकाडा जाणवत आहे. त्यामुळे उकाड्यातून कधी दिलासा मिळेल याची प्रतीक्षा करत आहे.

tapman 1 jpg webp

यावर्षी मान्सून लवकर माघारी फिरल्याने जिल्ह्यात परतीचा केवळ २० टक्के पाऊस होऊ शकला. पाऊस नसल्याने हवामान आता बहुतांश कोरडे झाल्यामुळे तापमानाचा पारा वाढला आहे.काल बुधवारी शहराचा पारा ३६ अंशांपर्यंत गेला होता. तर त्यासोबतच कोरड्या व उष्ण हवेचे प्रमाण वाढले असून, सोबतच बाष्पोत्सर्जनाचे प्रमाणदेखील वाढल्यामुळे असह्य उकाडा जाणवत आहे.

---Advertisement---

आगामी काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होऊन पारा ३७ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तसेच हवामानदेखील कोरडे राहणार असल्याने नवरात्रोत्सवापर्यंत जळगावकरांना ‘ऑक्टोबर हिट चा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मान्सून आता जवळपास परतला असून, अधिकृतरीत्या १० ऑक्टोबरनंतर राज्यातून मान्सून परतणार आहे

सध्या यात्तावरणात उष्णता वाढल्यामुळे बंगालच्या उपसागरात आगामी काही आठवड्यांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र विकसित होऊ शकते. हे क्षेत्र जर तीव्र स्वरूपाचे झाल्यास त्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊन जिल्ह्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची स्थिती निर्माण होऊ शकत नाही. मात्र, त्यामुळे उत्तरेकडून येणारे पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, जर क्षेत्र कमी तीव्र राहिले तर थंड वारे ऑक्टोबरअखेरपर्यंत महाराष्ट्राकडे येऊन, गुलाबी थंडीचे आगमन होऊ शकते. मात्र, सध्यातरी जळगावकरांना आठवडाभर तरी तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---