---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

डोक्यात दगड घालून तरुणाला संपवण्याचा प्रयत्न ; जळगावातील धक्कादायक घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२३ । जळगाव शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत असून क्षुल्लक कारणातून थेट जीवच घेण्याच्या घटना वाढत आहेत. रविवारी सायंकाळी जळगाव शहरात तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या झाल्याची घटनेला काही तासच उलटले असताना शहरातील जैनाबादमध्ये एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

crime 2 jpg webp webp

डिगंबर दिनकर सैंदाणे (वय २५, रा. जैनाबाद, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.याप्रकारे शहर पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात माहितीसाठी धाव घेतली.

---Advertisement---

डिगंबर दिनकर सैंदाणे हा जैनाबाद परिसरामध्ये एकटा राहत असल्याची माहिती आहे.तो परिसरात नाश्त्याची हातगाडी लावून उदरनिर्वाह करतो. दरम्यान संध्याकाळी त्याने हातगाडी बंद केल्यानंतर जेवणासाठी मासे घ्यायला जैनाबाद परिसरात गेला होता. तेथे अज्ञात तरुणांशी त्याचा कुठल्यातरी कारणावरून वाद झाल्याची माहिती मिळत आहे.

त्यातून अज्ञात तरुणांनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवण्याचा गंभीर प्रयत्न केला. या प्राणघातक आलेल्या त्याच्या डाव्या डोळ्याला व हनुवटीलादेखील मार लागला आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी व त्याच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याचेवर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---