जळगावकरांनो काळजी घ्या ! पुढचे काही तास महत्वाचे, IMD कडून मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

ऑगस्ट 15, 2025 9:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२५ । मागच्या दिवसापासून दडी मारलेला पाऊस जळगावसह राज्यात पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाला आहे. दरम्यान हवामान खात्याने पुढील ३ ते ४ तासांत मध्य महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. विशेष जळगाव जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असून त्याचपार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी केला आहे.

RN15
image 2

राज्यातील काही ठिकाणी तुफान पाऊस पडत असून नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जळगावातही रिपरिप पाऊस कोसळत आहे. यातच हवामान खात्याने पुढचे तीन ते चार तासात जळगावात जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसासह 30-40 वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्याचपार्श्वभूमीवर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisements

दरम्यान हवामान खात्यानं राज्यात आगामी पाच दिवसाचा पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात १८ ऑगस्टपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जाणारी केला आहे. मागच्या काही दिवसापासून पावसाअभावी माना खाली टाकलेल्या खरिपाच्या पिकांना या पावसामुळे जीवनदान मिळणार.

Advertisements

16 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

16 ऑगस्ट : रायगड, रत्नागिरी तसेच पुणे सातारा व कोल्हापूरच्या घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून बुलढाणा, अकोला, अमरावती आपल्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.
यलो अलर्ट : मुंबई, पालघर ,ठाणे, नाशिक व नाशिक घाटमाथा, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now