---Advertisement---
हवामान

जळगावला आजपासून पुढचे चार दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा : IMD कडून अलर्ट जारी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२३ । राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढलेला असताना त्यातच अवकाळी पावसाचे सावट आहे. जळगाव जिल्ह्यात आजपासून पुढील तीन दिवस वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यावर अवकाळीचे सावट असले तरी उन्हाचा पारा 40 वर कायम आहे.

rain jpg webp

यावर्षी बदलत्या हवामानाने शास्त्रज्ञांना देखील आश्चर्यचकित केले आहे. यंदा फेब्रुवारीच्या मध्यंतरी उष्णतेत वाढ झाल्यामुळे उष्णतेने नवा विक्रम केला होता. मात्र त्यानंतर मार्चमध्ये आणि आता एप्रिलमध्ये अधूनमधून होणाऱ्या गारपिटीसह अवकाळी पावसामुळे आत्तापर्यंत वातावरण जवळपास आल्हाददायक राहिले आहे. मध्येच उष्णता थोडी वाढते, पण त्यानंतरच बदलत्या हवामानामुळे पावसाची प्रक्रिया सुरू होते. मात्र आता हवामान खात्याने (IMD) या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.

---Advertisement---

त्यानुसार उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह जळगाव जिल्ह्याला आजपासून पुढचे चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यादरम्यान, विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी ता. सोसाट्याचा वारावाहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तविला आहे.

एकीकडे उन्हाचा पारा वाढल्याने नागरिक घामाघूम झाले होते. दोन दिवसापूर्वी राज्यातील सार्वधिक तापमानाची नोंद जळगावात झाली आहे. त्यातच आता अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने मागील दोन तीन दिवसापासून अधून मधून ढगाळ वातावरण होत आहे. दुपारून ऊन सावलीचा खेळ सुरु आहे. अवकाळीचा पावसाने जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40शी खाली येऊ शकतो.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---