⁠ 
बुधवार, जानेवारी 8, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | गळफास घेतलेल्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू ; जळगावातील घटना

गळफास घेतलेल्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू ; जळगावातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२३ । जळगाव शहरातील समता नगरात राहणाऱ्या दिया संदीप बनसोडे (वय १६) या अल्पवयीन मुलीने गळफास घेतला होता. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. दियाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना धक्का बसला असून तिने आत्महत्या का केली याचे कारण अजून समजून आलेले नाही. दरम्यान, याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमका काय आहे प्रकार?
शहरातील समता नगरामध्ये दिया ही आई, एक मोठी व एक लहान बहीण, आजी, आजोबा, काकू यांच्यासह राहत असून तिने ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास मागील खोलीत जाऊन गळफास लावून घेतला. तिच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी तिला तत्काळ खाली उतरविले. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी ती बेशुद्धावस्थेत व गंभीर होती.

पाच दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. ९ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालविली. तिचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दिया ११वीमध्ये शिकत होती. दरम्यान, तिच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे. दियाने आत्महत्या का केली याचे कारण अजून समजून आलेले नाही. रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.