जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२५ । आंतरराष्ट्रीय (International) घडामोडीमुळे सोन्याच्या किमतीने पुन्हा एकदा नवीन उच्चांक गाठला आहे. यामुळे ऐन लग्नसराईत सोन्याचे (Gold Rate) दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. जळगाव (Jalgaon) सराफ बाजारात शुक्रवारी सोने दरात ३०० रुपयाची वाढ दिसून आली तर दुसरीकडे चांदी (Silver Rate) दर स्थिर दिसून आला. आज तुम्हीही सोने आणि चांदी खरेदीला जात असाल तर आताचे भाव तपासून घ्या…Gold Rate Today

अलीकडे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकेचे अध्यक्ष पद स्वीकारताच त्यांच्या कठोर निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. भारतीय शेअर बाजार आणि सराफा बाजारात चढ-उतार सुरू आहेत. यातच सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे लोकांचा ओढा वाढला आहे. जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या मागणी वाढली आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमती वाढण्यात झाला आहे.
जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्यात सोन्याचा दर ७९,६५० रुपये प्रति तोळा इतका होता. त्यात या आठवड्यात सातत्याने वाढ दिसून आली. शुक्रवारी सोन्याच्या दरात प्रती तोळ्यामागे पुन्हा २०० रुपयांनी वाढ होऊन सोने ८०७०० रुपयांवर (जीएसटीसह ८३१२०) पोहचले. सोन्याचा हा दर आजवरचा सर्वाधिक उच्चांकी दर आहे.
एकाच आठवड्यात सोन्याने दोन वेळा उच्चांकी दर पातळी गाठली. सोमवारपासून सुरु होणाऱ्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही सोने दरात आणखी एक हजार रुपयांची वाढ होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याच्या दरात २०० रुपयांची वाढ झाली. दुसऱ्या दिवशी अनुक्रमे १०० रुपयांची वाढ झाली.
तर बुधवारी ७०० रुपयांनी सोने वाढून सर्वाधिक उच्चांकी पातळीवर पोहचले. गुरुवारी १०० रुपयांनी सोने दूर खाली आले. तर शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजाराच्या शेवटच्या दिवशी सोने दरात २०० रुपयांची वाढ होऊन सोने पुन्हा आजवरच्या सर्वाधिक उच्चांकी पातळीवर (८०७००, जीएसटीसह ८३१२० रुपये तोळा) पोहचले. जळगाव आज चांदीचा एक किलोचा भाव ९३००० रुपये प्रति किलो इतका आहे.