जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२५ । अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने ७५ देशांवर टेरिफला स्थगिती देण्याची घोषणा करताच जळगावच्या सुवर्ण बाजारात पुन्हा तेजी सुरू झाली.सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदी दरात मोठी वाढ झाल्याने सोन्याचे दर पुन्हा उच्चांकीच्या दिशेने जात आहे.

जळगावात काय आहे सोने चांदीचा भाव?
गुरुवारी जळगावच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १३०० रुपयांनी वाढले. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ११९२ रुपयांनी वाढला. यामुळे आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८३,६९५ रुपये (विनाजीएसटी) तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ९१,३०० रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. तर चांदी तब्बल २००० रुपयांनी महागली. दुसरीकडे चांदीचा दर देखील २००० रुपयांनी वाढून प्रति किलो ९४,००० हजार रुपयावर पोहोचली.
चालू आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सोने दरात ८०० रुपयांच्या घसरणीने झाली होती. दुसऱ्या दिवशी सोने १२०० रुपयांनी घसरले. यामुळे सोन्याचा भाव ८९ हजाराखाली गेला होता. मात्र बुधवारी १२०० रुपयांनी तर गुरुवारी १३०० रुपयांची वाढ झाली. गेल्या दोन दिवसात सोने २५०० हजार रुपयांनी महागले. तर चांदी ३ हजार रुपयांनी वाढली.
दरवाढीचे कारण?
अमेरिका आणि चीनमधील टेरिफ युद्धामुळे बाजारात अस्थिरता पसरली असून गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे कल वाढवला आहे. अमेरिकेने ७५ देशांवरील टेरिफ तात्पुरते स्थगित केले असले, तरी चीनवरील टेरिफ 125% पर्यंत वाढवली गेली आहे, ज्याचा थेट परिणाम जागतिक बाजारावर झाला आहे.