⁠ 
रविवार, मे 5, 2024

जळगावच्या सुवर्णपेठेत सोने चांदीने नवीन रेकॉर्ड नावावर नोंदवला ; भाव वाचून ग्राहक हैराण

जळगाव न्यूज | 06 एप्रिल 2024 | आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोने आणि चांदीचे रेकॉर्ड वर रेकॉर्ड करत आहे. दोन्ही धातुंनी मोठी उसळी घेतल्याने लग्न सराईसाठी खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना घाम फुटला आहे. दरम्यान, आज या धातूंनी नवीन रेकॉर्ड नावावर नोंदवला आहे.
जळगावच्या सुवर्णपेठेत

आज सोन्याचे दर 1200 रुपयांनी वाढले असून जीएसटी सह सोन्याचे दर हे 73 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर सुद्धा वधारले असून चांदी 83 हजारवर पोहोचले आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दराने 70 हजारांचा आकडा पार केला होता . काल 71 हजार 800 रुपयांवर असलेले सोन्याच्या दरात 1200 रुपयांनी वाढ झाली सोन्याचे जीएस टी सह दर हे 73 हजारांवर पोहोचले आहेत. चांदीच्या दरात सुद्धा तब्बल 2 हजार रुपयांनी वाढ झाली असून 81 हजार रुपयांवर असलेल्या चांदीचे दर 83 हजार रुपयांवर पोहोचले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच अनेक देशांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच प्रमाण वाढल्यामुळे सोन्याचे भाव वाढत असल्याचे सराफ व्यवसायिकांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे आहे लग्नसराई मध्ये सोन्याचे दर वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट मात्र चांगलेच कोलमडले असून सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी हात आखडता घेतला आहे.