जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२५ । एक लाखाचा टप्पा गाठलेल्या सोने दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. बुधवारी जळगाव सराफ बाजारात सोने दरात २४०० रुपयाची घसरण झाली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी गुरुवारी सोने आणि चांदीचा दर पुन्हा वधारला.

जळगाव सराफ बाजारात गुरुवारी सोन्याचे दर २०० रुपयांनी तर चांदी एक हजार रुपयांनी वाढली. यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ९६८०० रुपयांवर गेले. तसेच चांदीचा एक किलोचा दर ९९ हजारांवर गेले.
दरम्यान टेरिफ सोन्याच्या चालू आठवड्याच्या चार दिवसांत मोठे चढ-उतार बघायला मिळाले. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोने ९७५०० रुपये तोळ्यावर तर चांदी ९८ हजार रुपये किलोवर पोहोचली होती. मंगळवारी दिवसभरात तीन वेळा दरवाढ होऊन सोने ९९ हजारांवर गेले होते. त्यानंतर पुन्हा बुधवारी २४०० रुपयांची घसरण होऊन प्रति तोळ्याचे दर ९६६०० रुपयांवर खाली आले. मात्र गुरुवारी त्यात वाढ झाली.