जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२४ । जागतिक घडामोडीमुळे गेल्या काही दिवसात सोन्यासह चांदीच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. मात्र आता खरेदीदारांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला असून किमतीत मोठी घसरण झाली आहे.
जळगावच्या सुवर्णपेठेत या आठवड्यात पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत तब्बल ७०० रुपयाची घसरण दिसून आली. तर चांदीत १ हजारांची पडझड झाली. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इराण-इस्त्राईलमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता कमी झाल्याने जागतिक गुंतवणूकदारांनी इतरत्र मोर्चा वळवला आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे.
काय आहेत भाव :
सध्या जळगावात २२ कॅरेट सोने ६७,२३० रुपये प्रति १० ग्रॅम इतके आहे. तर २४ कॅरेट सोने विनाजीएसटी ६३,४०० रुपये असून जीएसटीसह दर ६५ हजार रुपयांहून अधिक आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात काल १००० रुपयाची घसरण झाली असून यामुळे आता चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ८३००० रुपयावर आला आहे.