⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | सोने-चांदीच्या दरवाढीचा कहर ; जळगाव सुवर्णनगरीमधील आताचे दर एकदा पहाच..

सोने-चांदीच्या दरवाढीचा कहर ; जळगाव सुवर्णनगरीमधील आताचे दर एकदा पहाच..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२४ । जागतिक बाजारातील घडामोडीमुळे सध्या सोने आणि चांदीत मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोने चांदीचे आजपर्यंतचे सर्वाधिक विक्रमी भाव पाहायला मिळाला. दोन्ही धातूंच्या किमती सामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत. अनेकांच्या खेरदीच्या उत्साहावर पाणी फेरले तर अनेक जण हिरमसून बाजाराबाहेर पडले.

काय आहे भाव?
सध्या जळगावच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ७४,४०० रुपयावर गेला आहे. तर जीएसटीसह सोन्याचा भाव ७६६५० रुपयापर्यंत गेला आहे. गेल्या सोमवारी सोन्याचा दर विनाजीएसटी ७३,१०० रुपयांवर होता.त्यात आठवड्याभरात तब्बल १३०० ते १४०० रुपयापर्यंतची वाढ झाली आहे.

दुसरीकडे चांदी दरवाढीने कहर केला आहे. सध्या एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ९०,००० हजार रुपयावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात ८४००० रुपयावर होता. म्हणजेच गेल्या आठवड्याभरात चांदीच्या दरात तब्बल ६००० ते ६२०० रुपयापर्यंतची वाढ झाली आहे.

दरवाढीचे कारण काय?
जागतिक बँकांचे व्याजदर कमी झाले आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वळवला आहे. तर चीनमध्ये सोने आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाली आहे. अनेक देशाच्या मध्यवर्ती, केंद्रीय बँक सोन्याचा साठा करुन ठेवत आहेत. या सर्व कारणांमुळे सोन्यामध्ये सातत्याने भाव वाढ होत असल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी दिली आहे. या दरवाढीने गुंतवणूकदारांचा फायदा झाला आहे. तर खरेदीदारांचा मोठा हिरमोड झाला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.