जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२४ । जागतिक घडामोडीमुळे सोने आणि चांदीने जोरदार मुसंडी मारली. देशात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याला आजपर्यंतचा विक्रमी भाव मिळाला. या दरवाढीने ग्राहकांना मोठा झटका बसला. Jalgaon Gold Silver Rate 20 April 2024
मध्य-पूर्वेत इस्त्राईल आणि इराण यांच्यात तणाव वाढला असून त्याचे पडसाद सोने-चांदीच्या किमतीवर दिसून आला. आज, 20 एप्रिल 2024 रोजी सुवर्णनगरीत सोन्याच्या किंमतींनी सराफा बाजारात 76 हजारांचा आकडा ओलांडला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव आहे. ऐन लग्नसराईत सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याने ग्राहकांना मोठा झटका बसला. काही ग्राहकांनी खरेदीचा बेत पुन्हा रद्द केला.
हा तर विक्रमी भाव
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे भाव 74 हजार 100 रुपये एवढे आहेत. जीएसटी सह हे भाव 76 हजार 300 रुपये एवढे असून आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याने 76 हजारांचा आकडा पार केला आहे.तर दुसरीकडे चांदीने सुद्धा 85000 चा आकडा पार केला आहे. जळगावच्या सराफ बाजारात जीएसटीसह चांदीचे दर हे 85 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचा सराफ व्यावसायिक यांचं म्हणणं आहे