जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२५ । गेल्या वर्षी २०२४ मध्ये सोन्याने ८० हजार रुपयाचा तर चांदीचा १ लाख रुपयाचा टप्पा ओलांडला होता. या वर्षी २०२५ तरी दोन्ही धातूंमध्ये दिलासा मिळेल अशी अपेक्षा ग्राहक बाळगून आहे. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीच्या (Gold Silver) भावात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाचा आज १२ वा दिवस आहे. अशातच सोन्याचा भाव पुन्हा वाढला आहे. Gold Silver Rate Today
जळगावात (Jalgaon) सुवर्णपेठेत सोने दरात पाचव्या चौथ्या दिवशी दरवाढ झाली. शनिवारी सोन्याचा भाव २०० रुपयांनी वाढला असून यामुळे आता जळगावात रविवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७८,६०० रुपये तर जीएसटीसह ८०,९६० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. दुसरीकडेच चांदीचा दर विनाजीएसटी ९२००० रुपयावर विकली जात आहे.
जळगावात या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर ७७,५०० रुपये प्रति तोळा इतका तर चांदी ९० हजार रुपयावर होती. मात्र गेल्या सहा दिवसात दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाली. या आठवड्यात सोने ११०० ते १२०० रुपयापर्यंत तर चांदी २००० ते २२०० रुपयांनी वाढली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात होणारी वाढ आता नवीन उच्चांक गाठत आहे.
ऐन लग्नसराईत सोने महाग, ग्राहकांना झटका
लग्नसराईची धामधूम सुरू असताना, सोन्याच्या दरात होणारी वाढ ग्राहकांसाठी मोठी चिंता निर्माण करत आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सोने हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि आता महाग झाल्याने ग्राहकांची परिस्थिती कठीण झाली आहे.
सोन्याचा दर नवीन उच्चांक गाठणार
तज्ज्ञांच्या मते, 2025 मध्ये सोन्याचे भाव नवीन उंची गाठू शकतात. देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव 85,000 ते 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक आणि स्थानिक आर्थिक घडामोडींमुळे सोन्याच्या दरात ही वाढ होण्याची शक्यता आहे.