जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२५ । एक दिवसाच्या घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. सोबतच चांदी देखील वधारली आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत बुधवारी सोने दरात प्रति तोळा तब्बल १२०० रुपयाची वाढ झाली. तर चांदी दरात प्रति किलो १००० रुपयाची वाढ झाली.

यामुळे सध्या जळगाव सराफ बाजारात २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ८२,५०३ रुपये (विनाजीएसटी) तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ९०,००० रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. दुसरीकडे चांदी दराचा १००० रुपयांनी वाढून ९२,००० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्याच्या अखेरच्या तीन दिवसात सोने दरात मोठी घसरण झाली होती. ९२ हजारापर्यंत गेलेला सोन्याचा भाव ८९ हजाराच्या खाली आला होता. उच्चांकी दरावरुन सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण होते पण आता सोन्याच्या दरात पुन्हा तेजी आली आहे.