जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२४ । या वर्षीच्या जुलै महिन्यात मांडण्यात आलेल्या बजेटमध्ये सीमा शुल्कात कपात केल्यानंतर सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. ऑगस्टच्या सुरूवातीला दोन्ही धातूच्या किंमती भडकल्या. त्यानंतर त्यात नरमाई आली. गेल्या दोन आठवड्यात किंमती उतरल्या होत्या. मात्र ऐन सणासुदीच्या तोंडावर दोन्ही धातूंनी भरारी घेतली आहे.
या आठवड्यात सोने आणि चांदीचे महागले आहे. सोमवारी सोन्याचा दर स्थिर होता. तर 10 सप्टेंबर रोजी सोने 440 रुपयांनी उतरले. त्यानंतर बुधवारी सोने 380 रुपयांनी वधारले. तर आज 12 सप्टेंबर रोजी त्यात किंचित वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,310 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीने देखील या आठवड्यात दमदार कामगिरी केली. 9 सप्टेंबरला चांदी 500 रुपयांनी वधारली. 10 सप्टेंबरला 1 हजारांची वाढ झाली. 11 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी किंमत वधारली. तर सकाळच्या सत्रात 12 सप्टेंबर रोजी 100 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,600 रुपये आहे.