जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२४ । जागतिक घडामोडींचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यानंतर ऑक्टोबरमध्ये पण सोन्यासह चांदी दरवाढीचा धबाडका लावला आहे. ऐन सुणासुदीत दोन्ही धातूंचे दर वधारल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसल आहे. जळगावच्या सराफा बाजारात अशा वधारल्या किंमती…
सोने दर
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात ३०० रुपयांनी वधारले. यामुळे विनाजीएसटी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ७६,८०० रुपयावर पोहोचला आहे. तर जीएसटीसह सोन्याचे प्रति तोला ७९ हजार रुपयांवर दर पोहचले. गेल्या काही दिवसापूर्वी जाणकारांनी सोने दर ८० हजार रुपयांवर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे आता सध्या सोने दरात सुरु असलेली दरवाढ पाहून सोने ८० हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तविला जात आहे. जर सोन्याचा भाव जर ८०,००० रुपयांच्या पुढे गेला तर यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसू शकतो.
चांदी दर
सोन्यासह चांदी दरात देखील तेजी आली आहे. जळगावात चांदीच्या दरात 2 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे विनाजीएसटी चांदीचा एक किलोचा दर ९३५०० रुपयावर पोहोचला आहे. तर जीएसटीसह चांदी प्रति किलो ९६,३०० रुपयांवर पोहोचली आहे. चांदीचे दर प्रति किलो एक लाखांपर्यंत पोहोचणार असल्याचा दावा सराफ व्यावसायिकांनी केला आहे.
सध्या नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीलाच जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्या- चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांची संख्या मंदावल्याचे सुवर्ण व्यवसायिकांचे म्हणणे आहे. सोने चांदीच्या दरात चढ-उतार कायम असल्याने ग्राहक खरेदी करण्यासाठी वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत.
जगात सध्या काही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. सध्या इराण-इस्रायल यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशिया खंडात युद्धासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीकडे मोर्चा वळवला आहे. यामुळे जागतिक बाजारात सध्या दोन्ही धातूंचे दर वाढताना दिसत आहे.