---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या वाणिज्य

जळगावात या आठवड्यात सोने-चांदीने दरवाढीचा बार उडवला ; पहा किती रुपयांनी महागले?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२४ । मागील काही दिवसाच्या सोने आणि चांदी दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. दोन्ही धातूंच्या किंमतीत एकदम घसरण झाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जळगावात सोने दरात ३०० रुपायाची घसरण दिसून आलीय. दुसरीकडे चांदी दरात हजार रुपयापर्यंतची घसरण झाली. तरी देखील विक्रमी घसरणीनंतर या आठवड्यात विक्रमी दरवाढ नोंदवली गेली. या आठवड्यात सोन्याने दोन हजारांची भरारी घेतली तर चांदीतही मोठी दरवाढ झाली.

gold silver 2 jpg webp webp

गेल्या महिन्याच्या २३ जुलैला देशाच्या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील शुल्क ६ टक्के करण्यात आल्याच्या घोषणेनंतर दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. सोन्याचे दर ७४ हजार रुपयांवरून ६९ हजाराच्या घरात आले होते. तर चांदी ८४ हजारापर्यंत आले होते. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता. परंतु या आठवड्यात सोन्यासह चांदीच्या किंमती वधारल्या.

---Advertisement---

सोन्यात या आठवड्यात १२०० ते १३०० रुपयांची वाढ झाली. २९ जुलैला सोने २०० रुपयांनी वधारले. मंगळवारी किंमती ६०० रुपयांनी उतरल्या. ३१ जुलै रोजी सोने ८०० रुपयांनी महागले. १ ऑगस्ट रोजी त्यात ५०० रुपयांची वाढ झाली.२ ऑगस्ट ५५० रुपयांनी किंमती वधारल्या. तर ३ ऑगस्टला सोने २५० रुपयांनी कमी झाले.

यामुळे आता जळगावच्या सुवर्णपेठेत २४ कॅरेट सोने विनाजीएसटी ७०,८०० रुपये प्रति १० ग्रॅम इतके आहे. दुसरीकडे या आठवड्यात चांदी २००० रुपयांनी महागली. सध्या एक किलो चांदीचा दर ८४००० रुपये इतका आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---