⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | जळगाव जिल्हा | सोने-चांदी दरात विक्रमी घसरण; आजचे जळगावच्या सुवर्णबाजारातील दर पहा..

सोने-चांदी दरात विक्रमी घसरण; आजचे जळगावच्या सुवर्णबाजारातील दर पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२४ । जून महिन्यात दिलासा देणाऱ्या सोने आणि चांदीच्या किमतीने जुलै महिन्याच्या सुरुवातीला ग्राहकांना वाढीचा झटका दिला होता. यामुळे सोन्याचा दर पुन्हा ७४ हजारावर गेला होता. तर चांदीचा दर ९३ हजारावर गेला होता. मात्र केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आणि नंतर सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठा उलटफेर झाला.

गेल्या आठवड्यात दोन्ही धातूंमध्ये विक्रमी घसरण झाली. परंतु या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याची किंमत वाढली. २७० रुपयांची दरवाढ झाली, मंगळवारी भाव २१० रुपयांनी उतरले. तर दुसरीकडे सोमवारी चांदीत ५०० रुपयांची दरवाढ झाली. मंगळवारी दुसऱ्या दिवशी तितकीच घसरण झाली. आज बुधवारी सकाळच्या सत्रात दोन्ही धातूंमध्ये घसरणीचे संकेत मिळत आहेत.

गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट सोने ६३,३५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ९६,१०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तसेच एक किलो चांदीचा भाव ८४,५०० रुपये आहे.

अर्थसंकल्पानंतर आतापर्यंत जळगावच्या सुवर्णपेठेत सोने तब्बल साडेपाच हजार रुपयांनी घसरले आहे. गेल्या आठवड्यात ७४५०० रुपये तोळा असलेले सोने आता विनाजीएसटी ६९२०० रुपये प्रति तोळा इतके आहे. दुसरीकडे चांदीत तब्बल १० हजार रुपयापर्यंतची घसरण झाली. दरम्यान, दर कमी झाल्याने दिवाळी,लग्नसराईसाठी करावयाची सोने दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला. मागील गेल्या दोन दिवसांत सुवर्णबाजारात दरवाढीने असलेले शुकशुकाटाचे वातावरण बदलून ग्राहकांची रेलचेल वाढली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.