जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२४ । सोने चांदी दरात चढ उतार दिसून येत असून गेल्या आठवड्यात दोन्ही धातूंमध्ये दरवाढ दिसून आली होती. मात्र या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदी दरात मोठी घसरण झालीय. यामुळे लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांना थोडा का असेना दिलासा मिळाला.
जळगाव सराफ बाजारात सोने भावात सोमवारी (२५ नोव्हेंबर) मोठी घसरण झाली. सोने भाव १३०० रुपयांनी घसरले तर दुसरीकडे चांदी दरातही १२०० रुपयापर्यंतची घसरण झाली. या घसरणीनंतर आज सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७७ हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर आले.तसेच चांदी ९० हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली.
मध्यंतरी घसरण झालेल्या सोने भावात चार दिवसांपासून वाढ होत गेली. यामध्ये २१ नोव्हेंबर रोजी ७७ हजार ७०० रुपयांवर असलेल्या सोने भावात २२ रोजी ८०० रुपये, २३ रोजी ४०० रुपयांची वाढ होऊन सोने ७८ हजार ९०० रुपयांवर पोहोचले होते. रविवारी हेच भाव कायम होते.
दुसरीकडे चांदीचे भाव तर कमी-कमी होत आहेत. यामध्ये २१ नोव्हेंबर रोजी ९३ हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात २२ रोजी एक हजार, २३ रोजी ३०० रुपयांची घसरण होऊन ती ९१ हजार ७०० रुपये प्रतिकिलोवर आली. सोमवारी तर थेट एक हजार २०० रुपयांची घसरण झाली व चांदी भाव ९० हजार ५०० रुपयांवर आले.