आनंदवार्ता ! सोने 700 रुपयांनी तर चांदी 2 हजारापेक्षा अधिकने घसरली, आताचे भाव पहा..
जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२४ । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरु आहे. दरम्यान तुम्हीही आज सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या वाढीनंतर जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याचा भाव जवळपास ७०० रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाला आहे. चांदीच्या किंमत देखील लक्षणीय घटली आहे. चांदीचा दर तब्बल २ हजारापेक्षा अधिकने घसरला आहे.
दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ अगदी तोंडावर आला असताना सोने आणि चांदीत मोठी दणआपट सुरु आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदी दरात घसरण दिसून आली. मात्र त्यानंतर दोन्ही धातूंमध्ये मोठी उसळी आली. सोन्याने १७ जुलै रोजी सोने-चांदी मोठी झेप घेतली. पण गुरुवारपासून दोन्ही धातूत पडझड दिसून येत आहे. चांदीतही या काळात मोठी घसरण झाली. गेल्या तीन दिवसांत सलग घसरणीने ग्राहकांना हे धातू स्वस्तात खरेदीची संधी मिळाली आहे.
जळगाव सराफा बाजार शुक्रवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७४,५०० रुपये प्रति तोळा इतका होता. त्यात आता ७०० रुपयांची घसरण झाली. यामुळे आज शनिवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७३,८०० रुपयांवर आला आहे. २२ कॅरेट सोन्याबद्दल बोलायचे झाले त्याची किंमत विनाजीएसटी ६७,६०० रुपये इतकी आहे. दुसरीकडे चांदीचा दर तब्बल २००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. यामुळे आज चांदीचा भाव विनाजीएसटी ९१,००० रुपये प्रति किलोवर आली आहे.
सोन्याचा भाव १ लाखांवर पोहचणार?
मात्र आगामी काही महिन्यात सोने १ लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. काही अर्थतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा भाव या वर्षीच्या शेवटपर्यंत किंवा पुढल्या वर्षी १ लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता काही आहे. सध्या जागतिक मंदी वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता असल्याचं अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे. नागरिकांमध्ये चांदीचा वापर देखील वाढला आहे. त्यामुळे याच वर्षाच्या अखेरपर्यंत चांदी देखील लाखांच्या पार जाण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.