⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | वाणिज्य | ग्राहकांना दिलासा! सोने-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण; आजचे नवे भाव तपासून घ्या..

ग्राहकांना दिलासा! सोने-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण; आजचे नवे भाव तपासून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२४ । सोने चांदी खरेदी करणाऱ्यांना किंचित दिलासा मिळाला आहे. सोने तसेच चांदीच्या दरांमध्ये आज मोठी घसरण झाली आहे. आज सोन्याचा दर प्रति तोळा ५०० रुपयापर्यंत घसरले आहे. मात्र आगामी काही महिन्यात सोने १ लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जळगावात काय आहे भाव?
जळगावात गुरुवारी सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीने ७५ हजार रुपयापर्यंतचा पल्ला गाठला आहे. मात्र आज घसरण दिसून आली. सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ६८,१५० रुपये प्रति तोळा इतका आहे तो यापूर्वी ६८,६०० रुपये रुपये इतका होता. तसेच २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७४,३५० रुपये रुपये रुपये प्रति तोळा इतका आहे तो यापूर्वी ७४,८४० रुपये इतका होता. तर एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ९३,२५० रुपये इतका आहे.

दरम्यान, चालू आठवड्याच्या पहिल्या तीनच दिवसात २४ कॅरेट सोने तोळ्यामागे जवळपास १५०० रुपयापर्यंत वाढले आहे. सोमवारी ७३३०० रु. तोळा असलेले सोने गुरुवारी ७४,८४० रुपयांवर पोहोचले. गेल्या आठवड्यात सोमवारी सोने ७३३०० रुपये तोळा होते. शनिवारी ते ७३१०० झाले. आठवडाभरात घसरण, वाढ दिसून आली.

सोन्याचा भाव १ लाखांवर पोहचणार?
काही अर्थतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा भाव या वर्षीच्या शेवटपर्यंत किंवा पुढल्या वर्षी १ लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता काही आहे. सध्या जागतिक मंदी वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता असल्याचं अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे. नागरिकांमध्ये चांदीचा वापर देखील वाढला आहे. त्यामुळे याच वर्षाच्या अखेरपर्यंत चांदी देखील लाखांच्या पार जाण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.