⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावात सोन्याने गाठला पुन्हा 75 हजाराचा पल्ला; चांदीही चमकली.. नवे दर पहा..

जळगावात सोन्याने गाठला पुन्हा 75 हजाराचा पल्ला; चांदीही चमकली.. नवे दर पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२४ । मे महिन्यात असमान दाखविणाऱ्या सोने आणि चांदीच्या किमतींनी जून महिन्यात दिलासा दिला. मात्र जुलै महिनात दोन्ही धातूंनी पुन्हा दरवाढीचा वेग पकडला आहे. मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली. जळगाव सुवर्णपेठेत एकाच दिवसात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून यामुळे सोन्याच्या किमतीने पुन्हा एकदा ७५ हजार रुपयाचा पल्ला गाठला आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोने महाग होताना दिसत आहे. जळगावात या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात ७३,२०० रुपयांवर असलेला सोन्याचा दर आता ७५ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. म्हणजेच तीन दिवसात सोन्याच्या किमतीत १५०० ते १८०० रुपयापर्यंतची वाढ झाली. दुसरीकडे चांदीचा दरात देखील तीन दिवसात अडीच ते तीन हजार रुपयांनी वाढलेला दिसून येत आहे.

काय आहे आता सोने-चांदीचा दर?
जळगाव सुवर्णपेठेत आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ६८,७६० रुपये प्रति तोळा इतका आहे तो यापूर्वी ६८,०१० रुपये इतका होता. तसेच २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७५,०१० रुपये रुपये प्रति तोळा इतका आहे तो यापूर्वी ७४,१७० रुपये इतका होता. तर एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ९५,००० रुपयांवर इतका आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.