जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२४ । मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत वाढदिसून आली. यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोन्याच्या किमतीत वाढ झाली.
जळगावच्या सुवर्णनगरीत मंगळवारी सोने ४०० रुपये प्रति तोळ्याने महागले. तर सोमवारी हजार रुपयांनी वाढलेल्या चांदीच्या दरात मात्र कुठलीही दरवाढ झाली नसल्याचे समोर आले.
आताच सोने चांदीचा भाव
सोने ४०० रुपयांनी वाढून आता प्रति दहा ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ७३,७०० रुपयावर गेला आहे. तर चांदीचा दर ९३,००० रुपये प्रति किलोवर आहे. दरम्यान, येत्या दिवाळीत सोन्याचे दर ८० हजारांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज जाणकारांनी पूर्वीच व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने ही वाटचाल असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.