जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदी पुन्हा विक्रमी उच्चांकावर ; आताचे दर वाचले का?

डिसेंबर 16, 2025 11:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२५ । गेल्या आठवडाभरापासून सोने-चांदीचे दर सर्वकालीन उच्चांक गाठत असून या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही धातूंच्या दरात मोठी दरवाढ दिसून आली. यामुळे जळगाव शहरातील सुवर्ण नगरीत सोन्यासह चांदीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे.

gold silver 1 jpg webp

जळगाव सराफ बाजारात सोमवारी दिवसभरात चांदीच्या भावात चार हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ती विनाजीएसटी १ लाख ९४ हजार रुपयांवर पोहोचली. तर सोन्याच्या भावात एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३३ हजार ५०० रुपयांवर पोहोचले.

Advertisements

सलग तीन दिवस भाववाढ झाल्यानंतर शनिवारी (१३ डिसेंबर) चांदीच्या भावात चार हजार ३०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ८९ हजार ७०० रुपयांवर आली होती. १४ रोजी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर १५ रोजी चांदीच्या भावात चार हजार ३०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ती पुन्हा एक लाख ९४ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. दुसरीकडे १३ डिसेंबर रोजी सोन्याच्या भावात ९०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३२ हजार २०० रुपयांवर पोहोचले होते. १४ रोजी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर १५ रोजी त्यात एक हजार ३०० रुपयांची वाढ झाली.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now