---Advertisement---
जळगाव जिल्हा वाणिज्य

खुशखबर! जळगावात सोने ५,७०० ने तर चांदी ११ हजारांनी स्वस्त, आताचे भाव पहा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२४ । लग्नसराईत ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांत दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ५,७०० रुपयांनी कमी होऊन गुरुवारी ७४,५०० रुपये आणि चांदीचे दर तब्बल ११ हजार रुपयांनी उतरून ८९ हजार रुपयांवर स्थिरावले. गुरुवारी सोने ९०० रुपये व चांदीचे दर १,८०० रुपयांनी घसरले.यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.

GS15Nov

ऐन दिवाळीत दोन्ही धातूंच्या किमतींनी रेकॉर्ड केला होता. मात्र आता गगनाला भिडलेले सोने आणि चांदी जमिनीवर येत आहे. जळगावच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारीही घसरण दिसून आली.

---Advertisement---

२४ कॅरेट शुद्ध सोने ७४,८०० रुपये (जीएसटीसह ७७,०४४) प्रतितोळा, तर चांदी ८९ हजार रुपये किलोवर स्थिरावली. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मौल्यवान धातूंचे दर खाली येत आहेत. बुधवारी सोन्याच्या दरात १०० रुपयांनी घसरण झाली, तर चांदी १ हजाराने वाढली होती. गुरुवारी सोने १२०० ने तर चांदी २ हजारांनी स्वस्त झाली.

दरम्यान, ३० ऑक्टोबर रोजी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ८०,२०० रुपये तर चांदीचा दर १,००,००० रुपयांवर होती. मात्र यानंतर दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाली. सोने ५,७०० ने तर चांदी ११ हजारांनी स्वस्त झाली आहे.या घसरणीने सराफा बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी एकच झुंबड उसळली आहे.कुटुंबात आगामी विवाहसोहळे आहेत त्यांच्यासाठी सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यांना आता थोडा दिलासा मिळू शकतो.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---