⁠ 
सोमवार, ऑक्टोबर 28, 2024
Home | जळगाव जिल्हा | दसऱ्यालाच सोने 1200 रुपयांनी तर चांदी 2000 रुपयांनी वाढली; वाचा जळगावातील आताचे भाव?

दसऱ्यालाच सोने 1200 रुपयांनी तर चांदी 2000 रुपयांनी वाढली; वाचा जळगावातील आताचे भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२४ । सोने दरात सलग चार दिवस घसरण झाल्याने प्रति तोळ्याचा दर ७५ हजारावर आला आहे. चांदी दरातही या आठवड्यात मोठी घसरण झाली.यामुळे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर खरेदीची योजना अनेकांनी आखली होती. मात्र दसऱ्याच्या पूर्वसंध्येला विजयादशमीच्या पूर्वसंध्येलाच शुक्रवारी सोने दरात तब्बल १२०० रुपयाची वाढ झाली. तर दुसरीकडे चांदी दरात २००० रुपयाची वाढ झाली. या दमदार चढाईमुळे दसऱ्याला खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकाचा खिसा कापल्या जाणार आहे.

आज काय आहेत भाव?
आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोने ९८८५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७६,२०० रुपये प्रति १० ग्रॅम इतके आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा भाव ९२००० रुपयावर पोहोचला आहे.

दरम्यान, जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्यात ७६ हजारापुढे गेलेला सोन्याचा दर या आठ्वड्यात घसरण ७५ हजारावर आला आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी, ७ ऑक्टोबर रोजी सोने प्रति तोळा ४०० रुपयांनी उतरले. मंगळवारी पुन्हा सोने दरात ४०० रुपयाची घसरण झाली. ९ ऑक्टोबर रोजी सोने ६०० रुपयांनी तर त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी २०० रुपयाने घसरले, तर ११ ऑक्टोबरला सोने तब्बल १२०० रुपयांनी वाढले

दुसरीकडे सोमवारी, ७ ऑक्टोबर रोजी चांदीचा प्रति किलोचा दर ९३,००० रुपये इतका होता. ८ ऑक्टोबर रोजी त्यात १००० रुपयाची वाढ झाल्याने चांदीचा दर ९४००० रुपयावर पोहोचला. ९ ऑक्टोबरला मात्र चांदी १००० रुपयांनी घसरण तर १० ऑक्टोबर रोजी चांदी दरात ३००० रुपयांची घसरण झाली. ११ ऑक्टोबरला चांदी दर स्थिर होता. मात्र शुक्रवारी चांदीचा प्रति किलोचा भाव २००० रुपयांना वाढला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.