जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२४ । एप्रिल आणि मे महिन्यात दरवाढीचा डोंगर गाठलेल्या सोने आणि चांदीच्या दरात जून महिन्यात घसरण होत असल्याचं दिसत आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जळगावच्या सराफ बाजारात चांदीचा दर तब्बल चांदीच्या भावात तब्बल दोन हजार ९०० रुपयांनी घसरण झाली. दुसरीकडे सोनेही २०० रुपयांनी घसरले. मात्र डिसेंबर महिन्यांपर्यंत सोन्याचे दर ८० हजार रुपयापर्यंत जाणार असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.
काय आहेत आता सोने-चांदीचा भाव?
सोमवारी झालेल्या घसरणीनंतर आता जळगावच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ७१ हजार ३०० रुपयावर आला आहे. सोबतच चांदीचा विनाजीएसटी ८९ हजार ३०० रुपये प्रतिकिलोवर आली आहे. सध्या चांदीच्या भावातील सततच्या या चढ-उतारांनी सराफा व्यावसायिकही संभ्रमात पडले आहेत.
डिसेंबरपर्यंत सोने गाठणार ८० हजारांचा टप्पा
गेल्या पंधरा दिवसांपासून सोन्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ व घसरण होत स्थिरता आली आहे. मात्र, असे असले तरी जुलैपासून सोन्याचे दर पुन्हा वाढून डिसेंबर महिन्यांपर्यंत सोन्याचे दर ८० हजार रुपये तोळ्यावर जाण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.
इराण-इस्त्राईल युद्धजन्य परिस्थितीनंतर सोन्यात तेजी आली. मात्र, वातावरण थंडावल्यानंतर दरात स्थिरता आली आहे. आगामी जुलै महिन्यात सोन्याचे दर पुन्हा वाढण्यास सुरुवात होऊन डिसेंबरपर्यंत हे दर ८० हजार रुपये तोळ्यापर्यंत जाऊ शकतील असा अंदाज सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे जाणकारांनी व्यक्त केला आहे.