जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२४ । सोने आणि चांदीच्या दराने पुन्हा उच्चांकीकडे धाव घेतली आहे. विशेष अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ दिसून आली. जळगाव सुवर्णपेठेत एकाच दिवसात सोने दरात तब्बल ११०० रुपयापर्यंतची वाढ दिसून आली. तर दुसरीकडे चांदी देखील एक हजाराने महागली. यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षेवर पाणी फेरल आहे.
मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात सोन्याच्या किमतींनी नवीन विक्रमी उच्चांकावर मुसंडी मारली. गेल्या महिन्यातील १७ एप्रिल रोजी सोन्याचा तोळा विनाजीएसटी ७४,२०० रुपये विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचला आहे. त्यांनतर सोन्यात घसरण दिसून आली. मे महिन्याच्या सुरुवातीला सोने घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
जळगावात या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा दर ७१,७०० रुपये प्रति तोळ्यावर आला होता. मध्यंतरी चढउतार दिसून आली. मात्र काल अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या दरात तब्बल ११०० रुपयांची वाढ दिसून आली. यामुळे सोन्याच्या किमतीने पुन्हा ७३ हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहे. चांदी देखील शुक्रवारी एक हजार रुपयांनी महागली.
काय आहेत जळगावात सोने चांदीचा दर:
आता २२ कॅरेट सोने ६७,०५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३,३०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ७५५०० रुपयावर गेला आहे. दुसरीकडे चांदीचा दर विनाजीएसटी ८४००० रुपये प्रति किलोवर आहे.