जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । गुढीपाडवा हा मराठी सण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी घरांमध्ये गुढी उभारली जाते आणि मराठी नवीन वर्षाची सुरूवात होते. या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहक सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहेत. मात्र गुढीपाडव्याच्या तोंडावर सोने चांदीचे दर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जाणून घेऊ या आज सोने चांदीचे दर किती आहे.

आजचा MCX वर सोने आणि चांदीचा भाव?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोन्याचा भाव वाढला आहे. चांदीच्या किंमतीदेखील वधारल्या आहेत. एक्सचेंजवर आज सोन्याच्या वायदा 240 रुपयांनी वधारला आहे. त्यामुळं 10 ग्रॅम सोन्याचा दर 87,500 रुपयांवर पोहोचला आहे. मागील आठवड्यात 89796 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत हा दर स्थिरावला होता. सोन्या प्रमाणेच चांदीच्या दरातही तेजी आल्याचे पाहायला मिळतेय. MCXवर चांदीचा मे महिन्याचा वायदा 460 रुपयांनी वधारून 97,954 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर याचा रेकॉर्ड हाय 104072 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.
जळगावात काय आहे सोने-चांदीचा भाव?
जळगावच्या सुवर्णनगरीत देखील सोने आणि चांदीचा भाव गगनाला भिडले आहे. या मार्चमध्ये २९०० रुपयांनी वाढलेले सोने शुक्रवारी ७०० रुपये घसरले. तर चालू आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने किंचित १०० रुपयांनी घसरले. या आठवड्यात अर्थात मार्च अखेरपर्यंत तेजीच राहील. सोने दोन ते अडीच हजाराने वाढून विना जीएसटी ९० हजार रुपयांचा टप्पा गाठण्याचा अंदाज जाणकारांना व्यक्त केला आहे. गुढीपाडव्याच्या तोंडावर सोने पुन्हा वाढणार. सध्या जळगावात २४ कॅरेट सोन्याचा भाव ८८,३०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर चांदीचा दर ९९,००० रुपये प्रति किलो इतका आहे.