---Advertisement---
गुन्हे

स्पोर्ट बाईक फिरायला घेऊन गेल्याने वाद ; रात्री गोलाणीला बोलावून तरुणाला संपविले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | २६ मार्च २०२३ | जळगाव शहरातील गोलाणी मार्केटच्या तळ मजल्यावर रविवारी रात्री सोपान गोविंदा हटकर (वय २५, रा. हरी विठ्ठल नगर, जळगाव) या तरुणाची चोपरने भोसकून हत्त्या करण्यात आली होती. जळगाव एलसीबीच्या पथकाने अवघ्या ४ तासात गुन्हा उघडकीस आणला असून चौघांना अटक केली आहे. मयत सोपान हटकर याची स्पोर्ट बाईक बाहेरगावी फिरायला घेऊन गेल्यानेच वाद सुरू झाला. दुचाकी परत करण्यापूर्वी सोपानने शिवीगाळ सुरू केल्याने चौघांनी त्याचा गेम केल्याचे समोर आले आहे.

golani murder case jpg webp webp

जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगरात सोपान हटकर हा आईसोबत राहत होता. सेंटरींग तसेच मिळेल ते मजुरी काम करुन तो उदरनिर्वाह चालवत होता. तर त्याची आई धुणीभांडीचे काम करुन हातभार लावत होती. सोपान याने काही दिवसांपूर्वी फायनान्सवर हप्त्याने बाईक घेतली होती. बाईकचे काही हप्ते थकल्याने कंपनीवाले ही दुचाकी ओढून घेऊन जातील या भितीने सोपानने त्याची दुचाकी त्याच्या जळगाव तालुक्यातील रिंगणगाव येथील रहिवासी मामा सुपडू अर्जून पाटील यांच्या शेतातील खळ्यात लपवून ठेवली होती.

---Advertisement---

सोपानचे जळगाव शहरातील मित्र गोविंदा शांतीलाल झांबरे आणि ज्ञानेश्वर दयाराम लोंढे ऊर्फ नानू हे सोपानने लपवलेली बाईक परस्पर घेऊन तिचा वापर करत होते. याबाबत सोपानने दोघांना वेळावेळी रागावले सुध्दा होते. पण त्यानंतरही २६ मार्च रोजी दुपारी गोविंदा झांबरे आणि ज्ञानेश्वर हे दोघंही सोपानची बाईक घेऊन पारोळा येथे लग्नाला गेले होते. सोपानला याबाबत समजताच त्याने फोन करुन “माझी बाईक परत द्या”, म्हणून दोघांना जळगावला बोलावले होते.

गोविंदा आणि ज्ञानेश्वर यांनी बाईक परत घेण्यासाठी सोपानला जळगाातील गोलाणी मार्केट येथे बोलावले. त्यानुसार सोपान त्याची बाईक घेण्यासाठी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट येथे गेला. याठिकाणी दुचाकी घेण्यावरुन त्याचा गोंविदा आणि ज्ञानेश्वर यांच्याशी वाद झाला. या वादातून दोघांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहूल भरत भट आणि करण सुभाष सकट या चार जणांनी सोपानवर चॉपरने सपासप वार करत त्याची हत्या केली. 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---