---Advertisement---
जळगाव जिल्हा नोकरी संधी

जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत अशासकिय कर्मचारी पद भरती; असा करा अर्ज?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२४ । जळगावातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे/मुलींचे वसतिगृह , माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह जळगाव तसेच माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह रावेर येथे तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी पध्दतीने वसतिगृह सहायक अधिक्षक, पहारेकरी कम एमटीएस ही पदे माजी सैनिक संवर्गातून भरावयाची आहेत. २७ डिसेंबर पर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

job jpg webp webp

यात वसतिगृह सहाय्यक अधिक्षक पदासाठी एक जागा असून यासाठी माजी सैनिक प्रवर्गातील हवालदार, नायब सुभेदार किंवा त्यापेक्षा मोठ्या पदावरून निवृत्त झालेले JCOs अर्ज दाखल करु शकतात. मराठी व इंग्रजी टाईपिंग येत असलेल्या JCOs ला प्राधान्य देण्यात येणार आहे.

---Advertisement---

तसेच पहारेकरी कम एमटीएस पदासाठी मुलांचे वसतीगृह जळगाव, मुलींचे वसतीगृह जळगाव, माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह, जळगाव आणि माजी सैनिक बहुउद्येशिय सभागृह, रावेर येथे प्रत्येकी एक पुरुष अशा ४ जागा भरायच्या आहेत. या पदाकरिता माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार अथवा माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे. या उमेदवारास २४ तास कामकाजासाठी उपलब्ध असावे लागणार आहे. सदर पद हे निवासी आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी आधारकार्ड, बँक पासबूक, रहिवाशी दाखला, (I Card & Discharge book for Ex servicemen only) दोन फोटो व Police verification certificate आवश्यक असणार आहे. निवड करण्याचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी राखून ठेवले आहेत. अधिक माहितीसाठी ०२५७-२२४१४१४. या दुरध्वनीवर संपर्क साधावा.

तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अन्य आवश्यक कागदपत्रांसह २७ डिसेंबर पर्यंत जळगाव येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश प्रकाश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---