जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जुलै २०२१ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात मागील गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने दडी मारली असून यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे टाकले आहे. दरम्यान, आज राज्यातील विविध ठिकाणी पावसाचे पुन्हा हजेरी लावली असून जळगाव जिल्ह्यात देखील येत्या एक दोन दिवसात मुसळधार पाऊस कोसळेल अशी माहिती हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी ‘जळगाव लाईव्ह’ शी बोलताना दिली.

राज्यात विविध ठिकाणी जून महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यातही पावसाने लावलेल्या पावसाच्या जोरावर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र जुलै महिना उजडूनही पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतकरी मोठ्या चिंचेत सापडला. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट आलेय.
मात्र, विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात सुखद व आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे येत्या काही दिवसात पावसाळ्याला पुन्हा सुरुवात होणार आहे. जळगाव जिल्ह्यात 12 तारखेपर्यंत सर्वत्र मुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी दिली आहे.
यावेळी निलेश गोरे असे म्हणाले की, दरवर्षी पावसाला कधीनाकधी ब्रेक हा लागतोच. मात्र हा ब्रेक ऑगस्ट महिन्यात किंवा त्याच्यापुढे दाखवा. यंदा मात्र हा ब्रेक जुलै महिना मध्ये लागल्यामुळे नागरिकांना पाऊस गायब झाला की काय असं वाटू लागलं आहे. असे काहीही झाले नसून येत्या आठवड्याभरात पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे. त्याची सुरुवात ही जळगाव शहरा पासून होईल असे गोरे यांनी जळगावला विषयी बोलताना सांगितले.