जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक संधी चालून आलीय. जळगाव जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतपेढी लि. जळगाव येथे भरती निघाली आहे. लिपीक व शिपाई या पदासाठी ही भरती निघाली असून यासाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता व संगणकीय अर्हता धारणकरीत असलेल्या पतपेढीच्या सभासद पाल्यांकडून स्वहस्ताक्षरात अर्ज मागविण्यात आले आहे.

या भरतीद्वारे एकूण ०४ रिक्त जागा भरल्या जातील. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी त्वरित अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५/०२/२०२४ रोजी पर्यन्त होती. मात्र अर्ज भरण्यास दिनांक ३०/०४/२०२५ रोजी पर्यन्त मुदतवाढ देण्यात आली आहे.
यापूर्वी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सभासद पाल्यांनी भरती प्रक्रिये संदर्भातील अटी व शर्ती संस्थेच्या कार्यालयात सूचना फलकावर लावण्यात आलेल्या आहेत. तसेच भरतीचा आवेदन अर्ज संस्थेच्या कार्यालयातून आवेदन अर्जाचे शुल्क भरुन घेता येईल.
पतपेढीच्या भरती प्रक्रियेबाबत निर्णय घेण्याचे आवश्यक ते उचित बदल करण्याचे सर्व अधिकार भरती संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळास राहतील. याबाबत सर्वानी नोंद घ्यावी.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) कनिष्ठ लिपीक (अस्थायी)
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेचा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर
२) शिपाई (अस्थायी)
शैक्षणिक पात्रता : १२ वी पास शारिरिक दृष्ट्या सुदृढ
किती पगार मिळेल:
कनिष्ठ लिपीक- रुपये १५०००/- दरमहा सर्व भत्ते मिळून ३ वर्षाकरिता
शिपाई – रुपये १२०००/- दरमहा सर्व भत्ते मिळून ३ वर्षाकरिता
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा