---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

Jalgaon : १५ हजाराची लाच स्वीकारताना जिल्हा आरोग्य अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४एप्रिल २०२५ । जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज ४ एप्रिल रोजी दुपारी रंगेहात अटक केली. या कारवाईने एकच खळबळ उडाली.

lach jpg webp webp

जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे एका तक्रारदाराने लाच मागणीची तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या शासकीय कामासाठी आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची सत्यता पडताळली आणि शुक्रवारी ४ एप्रिल रोजी दुपारी आरोग्य विभागात सापळा रचला. या सापळ्यात अतिरिक्त आरोग्य अधिकारी पदावरील एका व्यक्तीला तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

---Advertisement---

दरम्यान, एसीबीचे पथक आरोग्य विभागातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी करत असून त्यांच्याकडून या प्रकरणासंबंधित माहिती घेत आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषद येथे खळबळ उडाली आहे. जळगाव लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे पथक या प्रकरणाची पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाई करत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment