जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । मागील काही दिवसापासून राज्यात पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे नद्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, पुढील 3-4 तासात जळगावसह औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धुळे, या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे.
राज्यातील अनेक भागात पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असता अशातच हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे. येथे १४ ते १५ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्यातच आज सायंकाळी हवामान खात्याने जारी केलेल्या नव्या माहितीनुसार पुढील 3-4 तासात जळगावसह औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धुळे, या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्याला आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यापूर्वी यापूर्वी जून महिन्यात जळगाव जिल्ह्याकडे मान्सूनने पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला होता. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीलपासून जिल्ह्यात पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत.