---Advertisement---
जळगाव शहर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १६ वर्षाखालील मुलांची जिल्हा संघ निवड चाचणी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ । जळगाव जिल्ह्यातील सर्व १६ वर्षांखालील क्रिकेट खेळाडूंना सूचित करण्यात येते की आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव  जिल्हा क्रिकेट संघाची निवड चाचणीचे आयोजन करण्यात आला आहे.

जे खेळाडूं ०१ सष्टेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले असेल त्यांनी शनिवार दि. २४ जुलै २०२१ रोजी सकाळी ०८ वाजता उपास्थित राहावे. जळगाव  जिल्हातील जास्तीतजास्त क्रिकेट खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवावा.  निवड चाचणी जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या (विद्या इंग्लिश स्कूल मागील) मैदानावर घेण्यात येईल. सर्व खेळाडूंनी क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात  उपस्थित राहावे. या निवड चाचणीसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे त्याची लिंक

---Advertisement---

https://forms.gle/u1SKzBHoxaBxaedMA असून अधिक माहितीसाठी अरविंद देशपांडे (९४२२२७८९३६) व मोहम्मद फजल (९८३४१९७०७०) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---