⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | गुन्हे | जळगावचा सराईत गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध

जळगावचा सराईत गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२५ । जळगावमधील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, जेनसिंग ऊर्फ लकी जिवनसिंग जुन्नी (वय 34, रा. राजीव गांधी नगर, जळगाव) याच्यावर गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांमुळे एमपीडीए कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात आली असून त्याला नागपूर येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.

जेनसिंगवर जळगाव आणि इतर पोलीस ठाण्यांत एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये दरोडा, मारामारी, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी मारहाण, शस्त्र अधिनियमाचे उल्लंघन यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करून, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई सुरू केली. या प्रक्रियेत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचा सहभाग होता.

जेनसिंगच्या वागण्यात बदल न झाल्याने आणि त्याच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवरून, त्याला मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सफौ संजय सपकाळे, पोहेकॉ इरफान मलिक, सुनील दामोदरे, सुशील चौधरी यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या इतर अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.